बेंगळूर/प्रतिनिधी
शुक्रवारपासून केएसआरटीसीसह इतर परिवहन महामंडळ मालवाहू सेवा सुरू करीत आहेत. विधानसौध येथे शुक्रवारी सकाळी मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा यांच्या हस्ते ‘नम्मा कार्गो’ सेवांचे उद्घाटन झाले.
पहिल्यांदाच राज्य परिवहन विभाग पार्सल आणि मालवाहतुकीच्या क्षेत्रात काम करत आहे. राज्य मार्ग परिवहन बसस्थानकात बुकिंग काऊंटरवर ग्राहकांना त्यांचे पार्सल बुक करावे लागतील आणि सेवेसंदर्भात कोणतीही अडचण दूर करण्यासाठी विभागाने २४ तास कॉल सेंटर सुरू केले आहे. Www.nammacargo.in या संकेतस्थळावर ग्राहक कार्गो सेवा बुक करू शकतात.
पाच वर्षांसाठी स्ट्रॅटेजिक आऊटसोर्सिंग प्रायव्हेट लिमिटेड हा व्यवसाय सुलभ होईल आणि परिवहन विभाग कंपनीला बसस्थानकांवर आपले पार्सल काउंटर बसविण्यासाठी जागा उपलब्ध करुन देत आहे, असे परिवहन मंत्री सवदी यांनी सांगितले.