बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी अखेर सोमवारी राजीनामा दिला आहे. कर्नाटकात नेतृत्वबदल होण्याच्या चर्चा सुरु असतानाच येडियुरप्पा यांनी पायउतार होण्याचे संकेत दिले होते. गेल्या आठवड्यात येडियुरप्पा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची दिल्लीत भेट घेतली होती. येडियुरप्पा यांच्या राजीनाम्यानंतर नवा मुख्यमंत्री निवडण्यासाठी राजकीय घडामोडींना वेग आला आहे. दरम्यान, सोमवारी मुख्यमंत्र्यांनी आमदारांबरोबर जेवण घेऊन दुपारी राज्यपालांची भेट घेत त्यांच्याकडे आपला राजीनामा सुपूर्त केला. यांनतर, भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि कर्नाटकचे प्रभारी अरुण सिंह यांनी मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्यानंतर पुढच्या मुख्यमंत्र्यांविषयी भाष्य करण्यास त्यांनी नकार दिला आहे. त्यांनी हा निर्णय पक्षाच्या संसदीय मंडळावर आणि आमदारांवर सोपविला आहे.
अरुण सिंग यांनी “पुढचा मुख्यमंत्री कोण यावर बोलताना त्यांनी मी आता हे सांगणार नाही. भाजपचे संसदीय मंडळ पुढील मुख्यमंत्री आणि विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत निर्णय घेईल,” असे सिंह यांनी नवी दिल्लीत पत्रकारांना सांगितले. मुख्यमंत्री निवडीबाबत मीटिंग कधी होईल अशी विचारणा केली असता त्यांनी सांगितले की या ठिकाणी आपण काहीही बोलू शकत नाही.
येडीयुरप्पा यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्यामागील कारण काय, या प्रश्नावर सिंह यांनी सांगितले की त्यांनी स्वत: स्पष्टीकरण दिले आहे. त्यांच्या पुढील बेंगळूर भेटीबद्दल ते म्हणाले की, नंतर काय ते कळवू.
राजीनामा देताना काय म्हणाले येडियुरप्पा?
“कर्नाटकातील जनतेच्या मी ऋणात आहे. मी अधिकारी आणि आमदारांना सांगू इच्छितो, की जनतेने आपल्या सर्वांचा विश्वास गमावला आहे. आपण अधिक कठोर आणि स्वच्छ- प्रामाणिक मार्गाने कार्य केले पाहिजे. बरेच अधिकारी प्रामाणिक आहेत, मात्र सर्वांनीच ते झाले पाहिजे. बेंगळूर हा जागतिक दर्जाच्या शहरात विकसित होत आहे” अशा भावना येडियुरप्पा यांनी व्यक्त केल्या आहेत.