बेंगळूर/प्रतिनिधी
देशात पुन्हा एकदा करोनानं हातपाय पसरण्यास सुरुवात केली असून, वाढत्या धोक्यांबाबत लसीकरण बद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला. या बैठकीत बोलताना पंतप्रधानांना करोनावरील लसीच्या वितरणासंदर्भात सूचना केल्या. त्याचबरोबर करोनावरील लस कशीपर्यंत येईल हे आपण ठरवू शकत नाही, अशी माहिती पंतप्रधानांनी यावेळी दिली.या व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा आणि आरोग्यमंत्री डॉ सुधाकर यांनी भाग घेतला. देशातील सर्वाधिक करोनाचा प्रादुर्भाव झालेल्या आठ राज्यातील मुख्यमंत्र्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिगद्वारे संवाद साधला.
दरम्यान केंद्र सरकारच्या निर्देशानुसार, राज्यात लस वितरणाची तयारी सुरू आहे. २९४५१ लसी वितरण केंद्रे आणि १०,००० हून अधिक लसीकरणकर्ते आहेत. राज्यात जवळजवळ २,८५५ कोल्ड साखळी केंद्र आणि कोल्ड स्टोरेज सुविधा आहेत. तसेच यासाठी खासगी रुग्णालयेदेखील वापरली जातील, असे सुधाकर यांनी म्हंटले आहे.









