बेंगळूर/प्रतिनिधी
केंद्रीय मंत्री डी.व्ही. सदानंद गौडा यांची अचानक प्रकृती बिघडल्यामुळे रविवारी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मंत्री गौडा यांची प्रकृती स्थिर असून त्यांची प्रकृती सुधारत आहे. सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय रसायन व खते मंत्री डी.व्ही. सदानंद गौडा यांच्याशी बोलून त्यांना लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या. तसेच विश्रांती घेण्याचा सल्लाही दिला.
दरम्यान मंत्री गौडा यांची रक्तातील साखरेची पातळी कमी झाल्यामुळे रविवारी त्यांना बेंगळूर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले जात असून मंगळवारी त्यांना रुग्णालयातून सोडण्याची शक्यता आहे.
दरम्यान रविवारी सकाळी शिवमोगा येथे प्रदेश भाजप कार्यकारिणीच्या बैठकीला भाग घेत गौडा रस्त्याने बंगळूरला परतत होते. जाताना ते चित्रदुर्ग येथे जेवणासाठी थांबले पण ते गाडीतून खाली उतरताच बेशुद्ध झाले. त्यानंतर त्यांना बसवेश्वर रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांच्या मते, ब्लड प्रेशर कमी झाल्यानंतर रक्तातील साखर (साखर) ची पातळीही कमी झाली, त्यामुळे ते बेशुद्ध पडले असे ते म्हणाले.
दरम्यान पंतप्रधानांचे आभार मानण्यासाठी सोशल मीडियावर गौडा यांनी त्यांच्या व्यस्त वेळापत्रकात पंतप्रधानांनी त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी त्यांना कॉल केला.तसेच ते मला काही मौल्यवान टिप्स देण्यास विसरले नाहीत. महोदय, तुमच्या शुभेच्छा मला अजूनही मजबूत बनवत आहेत, पंतप्रधानांनी बोलल्यानंतर गौडा यांच्या जवळच्या सुत्रांनी सांगितले की पंतप्रधानांनी दुपारी त्यांच्याशी कॉलवर बोलून सुमारे दोन ते तीन मिनिटांच्या संक्षिप्त संभाषणात त्यांनी गौडा यांना विश्रांती घेण्याचा सल्ला दिला.









