बेंगळूर/प्रतिनिधी
११ ऑगस्टच्या बेंगळूर हिंसाचार प्रकरणी आणि ड्रग्ज प्रकरणात दोन चित्रपट अभिनेत्री आणि त्याच्या सहकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे, त्यांना जामीन मंजूर करावा, अशी मागणी करणारे धमकीचे पत्र ड्रग्ज प्रकरणाची सुनावणी करणाऱ्या एनडीपीएसच्या विशेष न्यायाधीशांना दिले होते. विशेष न्यायाधीशांना बॉम्बच्या धमकीप्रकरणी कर्नाटकातील तुमकूर जिल्ह्यातील दोन जणांना ताब्यात घेण्यात आले आहे, अशी माहिती पोलीस सूत्रांनी मंगळवारी दिली.
दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांना बेंगळूर येथे आणले जाईल, अशी माहिती एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर पीटीआयला माहिती दिली. तुमकूर जिल्ह्यातील टिप्तूर येथे कौटुंबिक कलह हे या घटनेमागील कारण असल्याचा संशय आहे, अशी माहिती त्यांनी पुढे दिली.
११ ऑगस्ट रोजी झालेल्या हिंसाचार आणि ड्रग प्रकरणी दोन चित्रपट अभिनेत्री यांना अटक करण्यात आली होती त्यांना जामीन मंजूर करावा अशी मागणी करणारे ड्रग रॅकेट प्रकरणाच्या सुनावणीच्या एनडीपीएसच्या विशेष न्यायाधीशांना सोमवारी येथे धमकी पत्र व एक डेटोनेटरसह पार्सल प्राप्त झाले.
ज्यानी पत्र लिहिले त्या व्यक्तीने असा इशारा दिला होता की मागण्या मान्य न झाल्यास स्फोट घडवून आणला जाईल. नंतर तपासात असे दिसून आले की आतमध्ये बॉम्ब नसून काही तारा होत्या. प्राथमिक चौकशीनुसार, हे पत्र तुमकूर जिल्ह्यातील चेळ्ळूर येथून पाठविण्यात आले आहे. दोन जणांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.