बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटकचे उपमुख्यमंत्री आणि उच्च शिक्षण मंत्री डॉ.सी.एन. अश्वथ नारायण यांनी राष्ट्रीय पात्रता कम प्रवेश परीक्षा (नीट) विषयी बोलताना राज्य सरकारने संयुक्त प्रवेश परीक्षा (सीईटी) यशस्वीरित्या घेतली ज्यामध्ये सुमारे दोन लाख विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. तसेच ६३ कोरोना पॉझिटिव्ह विद्यार्थ्यांनी परीक्षा देत चांगले गुणही मिळवले आहेत. त्यामुळे नीट परीक्षेला विरोध न करता सर्वांनी सहकार्य करणे गरजेचे आहे, असे ते म्हणाले.
नीट परीक्षेला विरोध करणे त्याच्या समजण्यापलीकडे आहे. कुणीही विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळू नये असे आवाहनही त्यांनी केले. नीट परीक्षा निषेधावर संशय व्यक्त करताना ते म्हणाले, की काही गटांना गुणवत्तेऐवजी अन्य मार्गाने जागा हव्या असतील. त्यांना काहीतरी चुकीचे वाटले. अगदी सुरुवातीपासूनच वैयक्तिक स्वार्थासाठी परीक्षेला अडथळा आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. परंतु त्यांची उद्दीष्टे पूर्ण होणार नाहीत, असे त्यांनी म्हंटले आहे.
नीट परीक्षा घेण्यात यावी मंत्री अश्वथनारायण यांनी स्पष्ट केले. कारण राष्ट्रीय पात्रता सह प्रवेशपरीक्षेच्या माध्यमातून विद्यार्थी देशभरातील महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेऊ शकतात. राज्य सरकार परीक्षा घेण्यास पूर्णपणे तयार आहे. त्यामुळे सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी केले आहे.