क्लब, पब आणि रेस्टॉरंट्समध्ये पार्ट्या करण्यावर बंदी
बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटक सरकारने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर क्लब, पब आणि रेस्टॉरंट्समध्ये नवीन वर्षाच्या उत्सवावर बंदी घातली आहे. रोगाचा फैलाव कमी करण्यासाठी ३० डिसेंबरपासून चार दिवस बंदी लागू असेल. तथापि, सामान्य कार्ये करण्याच्या या आस्थापनांवर कोणतेही बंधन नाही, असल्याचे स्पष्ट केले आहे.
कर्नाटकचे मुख्य सचिव टी. एम. विजय भास्कर यांनी गुरुवारी जारी केलेल्या आदेशानुसार सरकारने उत्सव काळात फक्त हिरव्या फटाके फोडण्याची परवानगी दिली आहे. दरम्यान त्यांनी जनतेला हातमिळवणी व मिठी मारणे टाळावे असे आवाहन केल आहे.
सार्वजनिक आरोग्याचा विचार करून, ख्रिसमस आणि नवीन वर्ष साध्या आणि अर्थपूर्ण पद्धतीने साजरे करण्याची गरज आहे. या पार्श्वभूमीवर, राज्यभर सार्वजनिक ठिकाणी, आस्थापनांमध्ये आणि सामाजिक अंतर न राखता मोठ्या संख्येने जमण्यास बंदी घालण्यात आली आहे.









