बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटकचे उपमुख्यमंत्री सी. एन. अश्वथनारायण आणि शासकीय उच्च अधिकाऱ्यांनी शुक्रवारी राज्याचे राज्यपाल वजुभाई वाला यांची भेट घेऊन नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० लागू करण्यासाठी राज्याने घेतलेल्या निर्णयासंदर्भात माहिती दिली.
कर्नाटकात सप्टेंबर पासून नवीन शिक्षण धोरण लागू करणार असल्याची माहिती आहे. जर कर्नाटकने सप्टेंबर पासून नवीन शिक्षण धोरण लागू केल्यास ते देशातील पहिले राज्य असेल. त्यामुळे राज्य सरकार सप्टेंबर पासून नवीन शैक्षणिक धोरण लागू करण्याच्या तयारीत आहे.
राज्य सरकार नवीन शैक्षणिक वर्षासाठी विविध पदवी अभ्यासक्रमांसाठी ऑनलाईन वर्ग १ सप्टेंबरपासून सुरू करणार आहे, अशी माहिती कर्नाटकचे उपमुख्यमंत्री आणि उच्च शिक्षणमंत्री अश्वथनारायण सी. एन. यांनी बुधवारी दिली आहे. तसेच ऑनलाईन वर्ग ऑक्टोबरपासून सुरू केले जातील, असेही त्यांनी म्हंटले आहे.
मंत्री अश्वथनारायण यांनी उच्च शिक्षण विभाग केंद्र सरकारकडून ऑफलाईन वर्ग तसेच सप्टेंबरमध्ये घेण्यात येणाऱ्या काही पदवी परीक्षांच्या मार्गदर्शक सूचनांची प्रतीक्षा करीत असल्याचे म्हंटले आहे. त्यामुळे एकूण परिस्थितीवरून राज्य सरकार लवकरच नवीन शैक्षणिक धोरण लागू करणार असल्याचे दिसत आहे.









