बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटकच्या केंद्रीय गुन्हे शाखेने (सीसीबी) गुरुवारी दोन नायजेरियन नागरिकांसह चार ड्रग्ज पेंडलरांना अटक केली आहे. यावेळी त्यांच्याकडून सीसीबीने ड्रग्ज जप्त केले.
सीसीबीने त्यांच्या ताब्यातून २०० एक्स्टसी गोळ्या ताब्यात घेतल्या. त्यांच्याकडून १३३ ग्रॅम एमडीएमए, पाच मोबाइल फोन, दोन मोटारसायकली, काही शस्त्रे आणि ४ हजार रुपये रोकड जप्त केली असल्याचे पोलिसांनी सांगितले. या चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.









