बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटक विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाला सोमवार पासून सुरुवात झाली आहे. अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी मुख्यमंत्री येडियुरप्पा अधिवेशनासाठी आल्यानंतर दुसर्या दिवसाची कार्यवाही सुरू झाली. सोमवारी सुरू झालेल्या १५ व्या विधानसभेचे सातवे अधिवेशन आठ दिवसांऐवजी कमी करण्यात आले.
अधिवेशनात भाजपा सरकारने सुरुवातीला ३२ विधेयक मंजूर करण्यासंदर्भात विश्वास व्यक्त केला होता (वित्त विधेयक, राज्य वित्तीय जबाबदारी कायद्यात केलेली दुरुस्ती, कामगार आणि कृषी जमीन मालकी कायद्यात बदल आणि एपीएमसी कायदा यासह), पण विरोधकांनी केवळ महत्त्वपूर्ण बिलांबद्दल चर्चा सत्रात चर्चा केली जाईल आणि इतर प्रश्न दीर्घ सत्रात घेण्यात येतील आग्रह धरला.









