शिक्षण मंत्री बी. सी. नागेश यांनी दिली माहिती
बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटक सरकार सध्या सुरू असलेल्या दसऱ्याच्या सुट्टीनंतर प्राथमिक शाळांमधील इयत्ता पहिली ते पाचवी विद्यार्थ्यांसाठी ऑफलाइन वर्ग पुन्हा करण्यात येणार आहेत. दरम्यान, कोरोना साथीच्या प्रसारामुळे जवळपास २० महिन्यांपूर्वी शाळा बंद होत्या.
कर्नाटकचे शिक्षण मंत्री बी. सी. नागेश यांनी, ज्या दिवशी शाळा सुरु होतील सरकार त्याच दिवसापासून शाळांमध्ये मध्यान्ह भोजन देणे देखील सुरू करेल. “विभाग तयार आहे आणि आमच्या अधिकाऱ्यांनी प्राथमिक शाळांमध्ये वर्ग पुन्हा सुरू करण्यासाठी आणि दुपारचे जेवण वितरित करण्यासाठी सर्व तयारी केली आहे. असे ते बेंगळूरमध्ये म्हणाले.
मंत्री नागेश म्हणाले, तथापि, आम्ही अद्याप कोविड -१९ तांत्रिक सल्लागार समितीशी चर्चा करत आहोत जेणेकरून शाळा पुन्हा सुरू झाल्यावरकोणतीही अडचण येणार नाही. गेल्या महिन्याच्या सुरुवातीला, सरकारने स्थापन केलेल्या तज्ज्ञ समितीने सुचवले होते की राज्य सरकार राज्यातील सर्व वर्गांसाठी शाळा पुन्हा सुरू करू शकते.