बेंगळूर/प्रतिनिधी
कोरोनामुळे आतापर्यंत सर्वच सण-उत्सव रद्द केले आहेत. आत दसरा महोत्सव सुरु असून यासाठी नियमावली जरी केली आहे. दरम्यान तांत्रिक सल्लागार समितीने कर्नाटक सरकारला कोरोनाच्या निमित्ताने दसरा उत्सव सुरक्षितरीत्या साजरा करण्याचा सल्ला दिला असून, खबरदारी म्हणून सामाजिक अंतर आणि मास्क वापरण्याचा सल्ला देखील दिला आहे. शांततेत उत्सव आयोजित करण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. राज्य सरकारने ज्येष्ठ नागरिक आणि मुलांना या महोत्सवापासून दूर ठेवण्याचा सल्ला दिला आहे.
एक परिपत्रक काढत सरकारने शारीरिक अंतर राखावे, मास्क वापरणे, वारंवार स्वच्छता राखावी, गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे आणि गर्दी करू नये यासारखी नियमावली जरी केली आहे.
आरोग्य व कुटुंब कल्याण आयुक्त पंकज पांडे यांनी १४ ऑक्टोबर रोजी जारी केलेल्या परिपत्रकात म्हटले आहे की, अनेक दिवस किंवा आठवडाभर चालणाऱ्या उत्सवामध्ये संख्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी पुरेशी उपाययोजना करावी असे म्हंटले आहे.









