बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटकने केरळमधील प्रवाश्यांसाठी नकारात्मक आरटी-पीसीआर चाचणी अहवाल अनिवार्य केल्यावर शेजारच्या केरळच्या कासारगोड जिल्ह्यात निदर्शने झाल्यानंतर दक्षिण कन्नड जिल्हा प्रशासनाने आदेश तात्पुरते मागे घेतल्याची घोषणा केली.
दक्षिण कन्नडचे उपायुक्त डॉ. के.व्ही. राजेंद्र यांनी हा आदेश तात्पुरते तीन दिवसांसाठी मागे घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. यानंतर कर्नाटकात प्रवेश करण्यापूर्वी नागरिकांनी सीमेवर नकारात्मक प्रमाणपत्र द्यावे लागेल. विद्यार्थी व कर्मचार्यांना निर्बंध न घालता कर्नाटकात येण्याची परवानगी देण्यात येईल, असेही ते म्हणाले.
दक्षिण कन्नड जिल्हा आरोग्य प्रमुख एस. रामचंद्र बरी यांनी, तळापडी गेटवर चाचणी प्रक्रियेदरम्यान बरेच लोक होते. त्यामुळे प्रवाशांना आरटी-पीसीआर प्रमाणपत्र मिळण्यासाठी वेळ मिळेल, यासाठी तीन दिवस अहवाल पाठविण्याचा निर्णय आम्ही घेतला नाही, असे ते म्हणाले.









