बेंगळूर/प्रतिनिधी
नुकत्याच पार पडलेल्या विधानपरिषदेच्या निवडणुकीत तीन जागा जिंकून सत्ताधारी भारतीय जनता पक्ष कर्नाटक विधानपरिषदमध्ये सर्वात मोठा पक्ष ठरला.
यामध्ये बेंगळूर शिक्षक, कर्नाटक ईशान्य शिक्षक आणि कर्नाटक पश्चिम पदवीधर मतदारसंघात मिळालेल्या विजयामुळे भाजपचे विधान परिषदेतील संख्याबळ वाढले आहे.
दक्षिणपूर्व पदवीधरांच्या मतदारसंघाचे अंतिम निकाल जाहीर होणे बाकी असताना जनता दल (सेक्युलर) उमेदवार चौद्रेड्डी थोपळ्ळी हे आघाडीवर आहेत. सध्या ७५ सदस्यांच्या परिषदेत जद (एस) कडे १४ जागा आहेत.









