बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटक सरकारने कोरोनाशी संबंधित आरोग्य सेवा पुरवणारे सार्वजनिक आरोग्य कर्मचारी आणि डॉक्टर यांच्याकडून संप किंवा काम करण्यास आता मनाई करता येणार नाही. कर्नाटक सरकारने डॉक्टर, आरोग्य कर्मचारी यांच्या संपावर घातली बंदी आहे.
सोमवारी कर्नाटकचे मुख्य सचिव टी. एम. विजय भास्कर यांनी डॉक्टर, पॅरामेडिक्स आणि आरोग्य सेवेतील कर्मचारी किंवा कंत्राटी पद्धतीने कामावर असलेल्यांना संपावर जाऊन काम थांबवण्याची धमकी देता येणार नाही. याविषयी एक आदेश पारित केला आहे.
दरम्यान अहवाल सादर न करणे, आदेशांचे पालन न करणे असे झाल्यास कारवाई करण्याचा इशारा सरकारने दिला आहे. राज्य कार्यकारी समितीचे अध्यक्ष या नात्याने संप, असहकार, आरोग्य सेवांशी संबंधित काम करण्यास नकार देणे किंवा काम न करणे यावर प्रतिबंध घालत असल्याचे म्हंटले आहे.
राज्य सरकारने कोरोना साथीची रोग म्हणून घोषित केल्याचे नमूद करून या आदेशात म्हटले आहे की, जे कर्मचारी काम न करणे किंवा काम करण्यास नकार देणे… हे अधिनियम, नियम किंवा आदेशांच्या तरतुदींचे उल्लंघन असेल आणि ते कारवाईसाठी पात्र असतील असे म्हंटले आहे.









