बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटक प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष डी.के.शिवकुमार यांच्या समर्थकांनी गुरुवारी बेंगळूरच्या एका मंदिरात १००१ नारळ फोडले. शिवकुमार यांना कोरोनाची लागण झाली असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. ते कोरोनातून लवकर बरे व्हावेत यासाठी त्यांच्या समर्थकांनी १००१ नारळ फोडत कोरोना मुक्तीसाठी प्रार्थना केली.
शिवकुमार यांना मंगळवारी कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले होते. त्यानंतर त्यांना राजानगर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शिवकुमार लवकर बरे व्हावेत यासाठी त्यांच्या कार्यकर्त्यांनी आज मंदिरात १००१ नारळ फोडून प्रार्थना केली.









