बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटक कॉंग्रेसचे अध्यक्ष डी. के. शिवकुमार यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांना उपचारासाठी बेंगळूरच्या राजाजीनगर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तसेच रविवारी प्रकृती ठीक नसल्याने त्यांनी उत्तर कर्नाटकातील पूरग्रस्त जिल्ह्यांचा दौरा रद्द केला होता.
डी. के. शिवकुमार यांनी आरोग्यविषयक कारणास्तव, २४ आणि २५ ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आलेल्या बेळगाव आणि बागलकोट जिल्ह्यातील पूरग्रस्त भागाचा दौरा पुढे ढकलण्यात आला आहे. लवकरच एक नवीन कार्यक्रम जाहीर केला जाईल, असे त्यांनी ट्विट केले आहे.
गेल्या आठवड्यात शिवकुमार यांनी नवी दिल्ली येथे कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची भेट घेतली होती.









