बेंगळूर/प्रतिनिधी
राज्याचे पोलीस महासंचालक आर. पी. शर्मा यांचे निधन झाले आहे. आर पी शर्मा १९८७ च्या तुकडीचे आयपीएस अधिकारी आहेत. त्यांची एका महिन्यापूर्वी पोलीस महासंचालक म्हणून निवृत्त झाली होती. दरम्यान बौद्धवारी त्यांचे बेंगळूर येथील खासगी रुग्णालयात बुधवारी संध्याकाळी अल्प आजाराने निधन झाले.
सप्टेंबर २०२० मध्ये, रिवॉल्व्हर साफ करताना स्वतःला गोळी लागल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
शर्मा यांनी अखेर कर्नाटक राज्य पोलीस गृहनिर्माण महामंडळाचे अध्यक्ष म्हणून काम पाहिले. त्यांच्या पश्चात पत्नी व दोन मुले असा परिवार आहे.









