बेंगळूर/प्रतिनिधी
राज्यात जिल्हा आणि तालुका पंचायत निवडणूक घेण्यावरून राज्य सरकार आणि राज्य निवडणूक आयोग यांच्या वाद असल्याचे नेत्यांच्या वक्तव्यावरून निदर्शनास आले आहे. दरम्यान, लॉकडाऊनमुळे झालेल्या नुकसानीवर विजय मिळविण्यासाठी लोक अजूनही संघर्ष करत असल्याने डिसेंबरपर्यंत निवडणुका घेतल्या जाऊ नयेत, असे सरकारचे मत आहे. त्यामुळे झेडपी-टीपी निवडणुकांच्या तारखांबाबत एसईसी आणि सरकार यांच्यात संघर्ष असल्याचे स्पष्ट झाले आहे.
जिल्हा व तालुका पंचायत निवडणुका घेण्याबाबत सरकार व राज्य निवडणूक आयोग (एसईसी) यांच्या वादंग सुरु आहे. राज्य सरकारचा निवडणूक घ्यायला विरोध आहे. पण राज्य निवडणूक अयोग्य निवडणूक घेण्यावर ठाम असल्याचे दिसून येत आहे. कोरोनाची दुसरी लाट कमी झालेली नसताना तिसरी लाट लवकर येण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तविली आहे. त्यामुळे तृतीय लाटेचा धोका लक्षात घेऊन सरकार निवडणूक घेण्यास संकोच करीत असताना, ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये निवडणूक घेण्याचा राज्य निवडणूक आयोगाचा निर्धार आहे.
दरम्यान, निवडणूक घेण्यावरून राज्याचे ग्रामविकास आणि पंचायत राजमंत्री के. एस. ईश्वरप्पा यांनी मंगळवारी राज्य निवडणूक आयोगाबद्दल आपली नाराजी व्यक्त केली होती. त्यांनी जिल्हा व तालुका पंचायत निवडणुका जाहीर करण्यापूर्वी सरकारने किमान समाधानासाठी सरकारशी चर्चा करायला हवी होती असे म्हंटले होते.