बेंगळूर/प्रतिनिधी
राज्यात कोरोना बाधितांची संख्या वाढतच आहे. त्याचबरोबर बरे होणाऱ्या रुग्णांची संख्याही जास्त आहे. सोमवारी नवीन कोरोना रुग्णांपेक्षा बरे होण्याऱ्यांची संख्या जास्त होती. तर एकूण चाचण्यांमध्ये मोठ्या प्रमाणात घट झाली आहे.
आरोग्य व कुटुंब कल्याण सेवा विभागाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार सोमवारी राज्यात ७,२३८ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. तर ६,४९५ नवीन रुग्णांची भर झाली. गेल्या आठवड्यात २६ ऑगस्टपासून राज्यात दररोज किमान ६० हजार चाचण्या घेण्यात आल्या. राज्यात गेल्या आठवड्याच्या तुलनेत चाचणीत घाट झाली असुन चाचण्यांची संख्या ४३,१३३ वर पोहचली आहे.









