बेंगळूर / प्रतिनिधी
मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी मंगळवारी गोव्यात कन्नड भवन बांधण्यासाठी 10 कोटी रुपयांचे अनुदान जाहीर केले. बोम्माई यांनी हे अखिल गोवा कन्नड महासंघाच्या शिष्टमंडळाला सांगितले .अखिल गोवा कन्नड महासंघाचे अध्यक्ष तसेच भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस सी.टी.रवी हे गोव्यातील पक्षाच्या कामकाजाचे प्रभारी आहेत.
“गोव्यात उत्तर कन्नड भाषेचे अनेक लोक राहतात. ते गोव्यातील कन्नड आणि त्याच्या संस्कृतीचे संरक्षण व्हावे म्हणुन कर्नाटक सरकार गोव्यात कन्नड भवन बांधत आहे,” मुख्यमंत्री बोम्माई यांनी त्यांच्या कार्यालयातून जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे.