बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटकातील मांड्या मतदार संघाच्या खासदार सुमलथा अंबरीश यांनी कोरोनावर मात केली आहे. २२ जुलै रोजी खा. सुमलथा यांचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आला आहे. कोरोनातून बरे झाल्यानंतर अभिनेत्री, खासदार सुमलाथा अंबरीश आता प्लाझ्मा दान करणार आहेत. सुमलाथा यांनी प्लाझ्मा दान करण्यासाठी डॉक्टरांच्या होकाराची वाट पाहत असल्याचे म्हंटले आहे.
एका दै. च्या वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीमध्ये कर्नाटकातील मांड्या लोकसभा मतदारसंघाच्या खासदरा सुमलाथा यांनी २८ दिवसांनंतर मी बारी झाल्याचे म्हंटले आहे. तसेच माझी प्लाझ्मा दान करण्याची इच्छा असून मी डॉक्टरांच्या होकारानंतर प्लाझ्मा दान करणार असल्याचे म्हंटले आहे.









