बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटकचे आरोग्य व वैद्यकीय शिक्षणमंत्री डॉ. सुधाकर यांनी शुक्रवारी सांगितले की सरकार कोरोनाशी संबंधित सर्व माहिती जाहीर करीत आहे. त्यामुळे संक्रमित व्यक्तींचा डेटा लपवण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. सत्य माहिती लपविण्याचा सरकारचा असा कोणताही हेतू नाही. डेटा गुप्त ठेवणे देखील शक्य नाही. सरकार कोणताही डेटा लपवत नाही, असे ते म्हणाले.
कोरोनाच्या नियंत्रणासंदर्भात सर्व विरोधी नेत्यांनी दिलेला सल्ला स्वागतार्ह आहे. जर त्यांना असे वाटले की कोरोना उपचार आणि मॅनेजमेंट सिस्टममध्ये एखादी त्रुटी आहे, तर मग ते त्यावर तोडगा काढू शकतात. त्यावर चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री सर्वपक्षीय बैठक बोलवू शकतात. सरकार कोणत्याही विषयावर चर्चा करण्यास तयार आहे.
मुख्यमंत्री निर्णय घेतील
कोरोनावर नियंत्रण ठेवण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी सणांच्या सार्वजनिक आयोजनांवर बंदी घातली आहे. कोविड तांत्रिक सल्लागार समितीने अनेक सावधगिरीचे उपाय सुचविले आहेत. मुख्यमंत्री स्वत: यावर निर्णय घेतील, असे सुधाकर म्हणाले.
कोणत्याही कार्यात मर्यादा घालणे कठीण आहे. संसर्गाचा प्रसार लक्षात घेऊन पुरेशा उपाययोजना केल्या जात आहेत. कोरोनाच्या दुसर्या लहरी दरम्यान आरोग्य विभागाने पोटनिवडणुकीच्या सुरक्षित कारवाई संदर्भातील सूचना निवडणूक आयोगाकडे पाठविली आहे, असे ते म्हणाले.