बेंगळूर/प्रतिनिधी
सोमवारी कर्नाटकमध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या घटली असल्याचे पहायला मिळाले. राज्यात गेल्या चोवीस तासात कोरोना संसर्गाची ५,७७३ नवीन प्रकरणे समोर आली आहे. तर गेल्या चोवीस तासात राज्यात १४१ रुग्णांचा मृत्यू झाल्याचे आरोग्य विभागाने म्हंटले आहे.
राज्यात सोमवारी ८०१५ रुग्णांनी कोरोनावर मात करत घरी परतले. आरोग्य विभागाने जारी केलेल्या बुलेटिननुसार राज्यात कोरोनाचे ९७,००१ सक्रिय रुग्ण आहेत. तर सोमवारी राज्यात ४५,४२१ चाचण्या घेण्यात आल्या.









