बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटक सरकारने सोमवारी युनायटेड किंगडम (यूके) वरून राज्यात येणाऱ्या सर्व प्रवाश्यांसाठी आरटी-पीसीआर चाचणी करण्याचे आदेश दिले आणि तसेच युरोपमधून येणाऱ्या प्रवाशांना अलग ठेवण्यासंदर्भातचे नियम जाहीर केले. यूकेमध्ये कोरोनाचे नवीन रुग्ण सापडत असल्याने राज्यसरकारने हे पाऊल उचलले आहे.
आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार २२ डिसेंबरपासून यूकेबाहेरील अन्य विमानतळांवर संक्रमण करणार्यांना आरटी-पीसीआर चाचण्या देखील अनिवार्य केल्या जातील. आरोग्य विभागाच्या अधिकार्यांशी झालेल्या बैठकीनंतर कर्नाटकचे आरोग्यमंत्री डॉ. के. सुधाकर यांनी प्राथमिक अभ्यासात असे दिसून आले आहे की नवीन कोरोना रुग्णांचे प्रमाण कमी असले तरीही हा रोग संसर्गजन्य असल्याने दक्षता म्हणून हा निर्णय घेतला आहे.
सावधगिरीचा उपाय म्हणून राज्य सरकारने यूके, डेन्मार्क आणि नेदरलँडमधील प्रवाश्यांसाठी आरटी-पीसीआर चाचण्या करण्याबरोबरच अलग ठेवण्याचे आदेश दिले आहेत, असे मंत्री म्हणाले.