बेंगळूर/प्रतिनिधि
कर्नाटकात बाधित रुग्णांची संख्या दररोज कमी होताना दिसत आहे. पॉझिटिव्ह रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रूग्णांची संख्या राज्यात जास्त आहे. दरम्यान मंगळवारी राज्यात २,७५६ पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली आहे. राज्यात मंगळवारी एकूण ९४,५३९ जणांची तपासणी करण्यात आली. तर राज्यातील विविध जिल्ह्यातील ७,१४० रुग्णा कोरोनावर मात करत रुग्णालयातून घरी परतले. कोरोनमुळे राज्यात मंगळवारी २६ बाधित रुग्णांचा मृत्यू झाला.
राज्यात एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या ८,३२,३९६ वर पोहोचली आहे. तर यापैकी ७,८०,७३५ रुग्णांनी आतापर्यंत कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यात आता ४०,३९५ रुग्ण उपचारात आहेत. तर एकूण ११,२४७ रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.









