बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटकात कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. राज्यात सध्या ५५ हजाराहून अधिक रुग्ण उपचारात आहेत. राज्यात कोरोनाला आळा घालण्यासाठी सर्व उपाययोजना राबविल्या जात आहेत. दरम्यान सरकारने बेंगळूरसह आठ शहरांमध्ये नाईट कर्फ्यू लावण्याचा निर्णय घेतला आहे. आजपासून हा कर्फ्यू लागू होईल. १० ते २० एप्रिल दरम्यान रात्री १० ते सकाळी ५ या वेळेत नाईट कर्फ्यू लागू केला जाणार आहे. राज्यात आरोग्य आणि अत्यावश्यक सेवांना परवानगी आहे.
कर्नाटक सरकारने दहा दिवस चालवलेल्या “कोरोना कर्फ्यू” लागू होण्याच्या एक दिवस अगोदर शुक्रवारी कारखाने, कंपन्या आणि संस्था यांना नाईट शिफ्ट सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. परंतु कर्मचार्यांना अहवाल द्यावा लागेल. तसेच रात्री १० च्या आधी कामाच्या ठिकाणी जावे लागणार आहे.









