बेंगळूर/प्रतिनिधी :
कोरोनाने देशभरात थैमान घातले आहे. कर्नाटकातही दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. या साथीच्या दरम्यान कर्नाटकात बर्याच भागात पाऊस पडल्याने राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री के. सुधाकर यांनी गुरुवारी लोकांना सावधगिरी बाळगण्यास आणि काही लक्षणे आढळल्यास आरोग्य विभागाच्या हेल्पलाईनशी संपर्क साधण्यास सांगितले.
राज्याच्या किनारपट्टी, मालनाड आणि उत्तर अंतर्गत भागातील अनेक जिल्ह्यांत मुसळधार पाऊस पडत आहे. कोरोना संक्रमणादरम्यान या पावसात लोकांना अत्यंत सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. ताप, खोकला आणि सर्दीची लक्षणे आढळल्यास त्वरित आरोग्य विभागाच्या १०४ या हेल्पलाईनला कॉल करा. असे सुधाकर यांनी ट्विट केले आहे.