बेंगळूर/प्रतिनिधी
वैद्यकीय शिक्षणमंत्री डॉ. के. सुधाकर यांनी राज्यात रुग्ण बरे होण्याचा दर चांगला आहे. गेल्या एका आठवड्यात, ५० टक्के पेक्षा जास्त रुग्णकोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. रुग्ण बरे होण्याचा दर राज्यात ११.३७ टक्के तर बेंगळूर शहरात २०.७५ टक्क्यांनी वाढला आहे, असे ते म्हणाले.
मंत्री सुधाकर यांनी अमेरिकेपेक्षा भारतातील परिस्थिती चांगली आहे. मृत्यूचे प्रमाण अमेरिकेत ३.२५ टक्के आणि भारतात २.०९ टक्के आहे. गुरुवारी कर्नाटकमधील मृत्यूचे प्रमाण १.९३ टक्के होते. दिल्लीत मृत्यूचे प्रमाण १० लाख लोकसंख्येमध्ये २०४ आहे तर कर्नाटकमध्ये ४२ आहे. गुरुवारी राज्यात ४८,४२१ नमुन्यांची चाचणी घेण्यात आली, जी एका दिवसात सर्वाधिक आहे. आतापर्यंत १५ .८१ लाख नागरिकांची कोरोना विषाणू तपासणी करण्यात आली आहे.
डॉ. सुधाकर यांनी कोविड यांच्यामुळे शहरातील मनिपाल रुग्णालयात दाखल असलेले मुख्यमंत्री येडियुरप्पा आणि सभागृहातील विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या यांच्या आरोग्याबाबत डॉक्टरांची एक विशेष टीम दोघांच्या आरोग्यावर लक्ष ठेवून आहे आणि दोघांच्या आरोग्यात सुधारणा आहे. असे म्हंटले.