बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटक फिल्म चेंबर ऑफ कॉमर्स (केएफसीसी) च्या प्रस्तावित निवडणुका २७ मार्चरोजी घेण्यात येणारी अध्यक्षीय निवड जूनपर्यंत तहकूब करण्याचा निर्णयघेण्यात आला आहे. २७ फेब्रुवारी रोजी झालेल्या केएफसीसीच्या बैठकीत त्यांनी २७ मार्च रोजी वार्षिक सर्वसाधारण सभा घेण्याचे आणि अध्यक्ष व अन्य पदाधिकारी निवडण्यासाठी निवडणुका घेण्याचा निर्णय घेतला होता.
दरम्यान कार्यकारी समितीने २ मार्च रोजी तातडीची बैठक घेतली आणि वार्षिक सर्वसाधारण सभा तहकूब करुन जूनपर्यंत निवडणुका घेण्याचा निर्णय सर्वानुमते घेतला. आम्ही वार्षिक सर्वसाधारण सभेचे वेळापत्रक आणि निवडणुकांचे वेळापत्रक याबद्दल केएफसीसी सदस्यांची माहिती घेणार आहोत, असे केएफसीसी अध्यक्ष डी. आर. जयराज यांनी सांगितले.
केएफसीसीचे शिष्टमंडळ वार्षिक सर्वसाधारण सभा आयोजित करण्यासाठी आणि निवडणुका घेण्याकरिता निधी वापरण्याची परवानगी मागण्यासाठी सरकारी अधिकाऱ्यांची भेट घेईल. वार्षिक सर्वसाधारण सभा आयोजित करण्यासाठी आणि निवडणुका घेण्यासाठी आम्हाला निधीची आवश्यकता आहे. आम्ही गुरुवारी संबंधित अधिकाऱ्यांना भेटू, असे केएफसीसी अध्यक्ष म्हणाले.









