बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटकातील ज्येष्ठ मंत्री के. एस. ईश्वरप्पा यांनी बुधवारी कबूल केले की मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांना पदावरून हटविण्याबाबत पक्षतील काहीजण प्रयत्न करत आहेत आणि यावर हाय कमांड अंतिम निर्णय घेईल, असे ते म्हणाले. दरम्यान, भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस अरुण सिंग यांच्या बेंगळूर दौऱ्यापूर्वी ईश्वरप्पा यांचे विधान पुढे आले आहे. सिंग हे कर्नाटकचे प्रभारी आहेत ते दौऱ्यावेळी मंत्री, आमदार आणि कार्यकर्त्यांशी चर्चा करतील अशी अपेक्षा आहे.
“हे खरे आहे की काहींनी मुख्यमंत्री बदलले जावेत असा प्रस्ताव मांडला होता. तर काहींनी येडियुरप्पा हेच मुख्यमंत्री असावरत असे म्हंटले होते. तर मुख्यमंत्री बदलाबाबत काहीजण दिल्ली येथे गेले, ”असे ग्रामविकास आणि पंचायत राजमंत्री ईश्वरप्पा यांनी पत्रकारांना सांगितले.
पक्षात समस्या असल्याचे त्यांनी कबूल केले. “मी काही बोलणार नाही असे म्हटल्यास खोटे बोलत आहे. सिंह समस्या सोडवण्यासाठी आहेत, ” असे ते म्हणाले.
येडियुरप्पा यांनामुख्यमंत्री पदावरून हटवण्याचा प्रयत्न केला जात आहे हे जाहीरपणे मान्य करणारे एश्वराप्पा हे दुसरे मंत्री आहेत. गेल्या महिन्याच्या अखेरीस महसूलमंत्री आर. अशोक यांनी येडीयुरप्पा यांना हटवण्याचे प्रयत्न होत असल्याचे सांगितले होते. ईश्वरप्पा यांचे येडियुरप्पांबरोबर प्रेम-द्वेषपूर्ण संबंध असल्याचे ओळखले जाते. एप्रिलमध्ये, ईश्वरप्पा यांनी राज्यपाल वजुभाई आर. वाला यांच्याकडे येडियुरप्पा हे त्यांच्या विभागात हस्तक्षेप करत असल्याची तक्रार घेऊन गेले होते.
दरम्यान, आमदार, मंत्री आणि पदाधिकारी सिंग यांची भेट घेतील व त्यांना ज्या समस्या असतील त्या व्यक्त करतील,” असे ईश्वरप्पा म्हणाले. सिंग यांच्या भेटीनंतर नेतृत्वात बदल होईल का असे विचारले असता ते म्हणाले: “मला माहित नाही. हाय कमांड जो काही निर्णय घेईल तो अंतिम असेल. ”









