म्हैसूर/प्रतिनिधी
शुक्रवारी म्हैसूरमध्ये उद्योग व उद्योग संघटनांच्या प्रतिनिधींसह झालेल्या बैठकीत उपायुक्त रोहिणी सिंधुरी यांनी कारखान्यात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी करणे आवश्यक असल्याचे म्हंटले आहे. तसेच सर्व कर्मचार्यांच्या चाचण्या घेण्यासाठी कंपनी मालकांचा पाठिंबा असल्याचे म्हंटले आहे.
म्हैसूरमधील सर्व फॅक्टरी कामगारांच्यामध्ये कोरोना प्रसार रोखण्यासाठी उपायुक्त रोहिणी सिंधुरी यांनी कामगारांची कोरोना चाचणी केली जाईल असं म्हंटल आहे.
दरम्यान शुक्रवारी येथे विविध उद्योगांचे प्रतिनिधी आणि म्हैसूर इंडस्ट्रीज असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांसमवेत झालेल्या बैठकीत उपयुक सिंधुरी यांनी सर्व कामगार व कर्मचार्यांच्या चाचण्या घेण्यात येण्यासाठी उद्योजकांनी सहकार्य करण्याची मागणी केली.
५० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या कामगारांची चाचणी करण्यावर भर देण्यास सांगण्यात आले. तसेच ज्यांच्यात लक्षणे आढळतील त्याची त्वरित तपासणी करावी यासाठी आरोग्य विभागाने या संदर्भात व्यवस्था करावी, असे उपायुक्तांनी या बैठकीत सांगितले आहे.
यावेळी बैठकीस म्हैसूर इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष व माजी आमदार वसू, सचिव सुरेश कुमार जैन, जिल्हा आरोग्य अधिकारी अमरनाथ, म्हैसूर सिटी कॉर्पोरेशनचे आरोग्य अधिकारी डी.जी. नागराज, उद्योगांचे प्रमुख, प्रतिनिधी आणि अधिकारी उपस्थित होते.









