बेंगळूर/प्रतिनिधी
बारावी मंडळाच्या (पीयू) परीक्षेच्या वेळापत्रकात बदल झाल्यामुळे एसएसएलसी परीक्षा वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. राज्याचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षणमंत्री एस. सुरेश कुमार यांनी यापूर्वी १४ जून ते २५ जून दरम्यान एसएसएलसी परीक्षा होणार असल्याचे सांगितले होते. परंतु पीयू परीक्षेत बदल झाल्याने शिक्षण विभागानेही वेळापत्रक बदलण्याचा निर्णय घेतला. आता २०२०-२१ ची एसएसएलसी परीक्षा २१ जून ते ५ जुलै दरम्यान घेण्यात येणार आहे.
एसएसएलसी २०२०-२१ परीक्षेसाठी सुधारित वेळापत्रक :
२१ जून – पहिली भाषा (कन्नड, तेलगू, मराठी, हिंदी, तामिळ, उर्दू, इंग्रजी, संस्कृत)
२४ जून – गणित
२८ जून – विज्ञान
३० जून – तृतीय भाषा (हिंदी, कन्नड, इंग्रजी, अरबी, पर्शियन, उर्दू, संस्कृत, कोंकणी, तुला)
२ जुलै – दुसरी भाषा (इंग्रजी, कन्नड)
५ जुलै – सामाजिक विज्ञान









