बेंगळूर/प्रतिनिधी
राज्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने आरोग्य यंत्रणेवर याचा ताण पडत आहे. कर्नाटक राज्य वैद्यकीय शिक्षण विभाग नर्सिंग असोसिएशनने (केएसएमएडीएनए) कोरोना विषाणूची लागण होणाऱ्या परिचारिकांची वाढती संख्या चिंता व्यक्त करणारीअसल्याचे म्हंटले आहे. त्यामुळे परिचारिका व त्यांच्या कुटूंबियांना चांगल्या आरोग्य सुविधा देण्याची मागणी सरकारकडे केली आहे.
केएसएमएडीएनए अध्यक्ष संतेश कुमार बी. ते म्हणाले की, मागील एक वर्षात सुमारे ३ हजार नोंदणीकृत परिचारिकांपैकी ९०० परिचारिकांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. अनेकांना एकापेक्षा जास्त वेळा संसर्ग झाला आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेच्या वेळी परिचारिका व आरोग्यकर्मचाऱ्यांची अवस्था चांगली होती. पण दुसर्या लाटेवेळी कोणतीही तयारी करण्यास वेळ दिला नाही. अचानक संसर्ग झालेल्यांची संख्या वाढू लागली. मृत्यूचे प्रमाण थांबायचं नाव घेत नाही. दरम्यान, त्यांनी शासनाकडून परिचारक व त्यांच्या कुटुंबीयांना चांगल्या आरोग्याची सुविधा व वेळेवर उपचार देण्याची मागणी केली आहे. कोणत्याही परिस्थितीत तिसऱ्या लाटेला थांबविले पाहिजे हे सरकारने निश्चित केले पाहिजे, असे ते म्हणाले.
व्हिक्टोरिया हॉस्पिटलच्या कोविड वॉर्डमध्ये काम करणात्या एक परिचारिकेने वाढत्या रुग्णसंख्येमुळे कामाचे प्रमाण वाढले आहे. गेल्या वर्षी केवळ दोन ते तीन टक्के रुग्ण ऑक्सिजनवर अवलंबून होते. या वेळी इस्पितळात दाखल झालेल्या सुमारे ८० टक्के रुग्णांना ऑक्सिजनची आवश्यकता आहे. अशा रुग्णांवर सतत देखरेखीची आवश्यकता असते, त्यामुळे कामाचा ताण पडत आहे.
आणखी एका परिचारिकेने कुटुंबातील सदस्यांना संसर्ग होण्याची शक्यता जास्त असल्याचे वैयक्तिक आणि कौटुंबिक जीवनावर याचा परिणाम झाला आहे. मुलांबरोबर वेळ घालवण्याची संधी मिळत नाही. अनेक परिचारिका सुट्टीशिवाय काम करत असतात. घरी परत जाताना मुलांना आणि कुटूंबाला संसर्ग होण्याची भीती असते. तर याआधी आणि आताही बर्याच परिचारिकांच्या संपूर्ण कुटुंबास लागण झाली आहे.









