बेंगळूर/प्रतिनिधी
एआयएडीएमकेने बुधवारी पक्षविरोधी कारवाया केल्याच्या आरोपाखाली कर्नाटक युनिटचे सचिव एम. पी. युवराज यांना पक्षातून हकालपट्टी केल्याची माहिती दिली. युवराज यांनी पक्षीय तत्त्वांचे उल्लंघन केले आणि त्यामुळे त्यांची बदनामी झाली, असे एआयएडीएमके समन्वयक ओ. पन्नेरसेल्वम आणि के. पलानीस्वामी यांनी निवेदनात म्हटले आहे, परंतु कारवाईचे कारण सांगितले नाही.
युवराज यांना प्राथमिक सदस्यांसह सर्व पक्षीय जबाबदाऱ्या काढून घेतल्या आहेत, असे ते म्हणाले. दरम्यान अण्णाद्रमुकच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्याशी संपर्क साधू नये असे म्हंटले आहे.









