बेंगळूर/प्रतिनिधी
उद्योगांशी संबंधित संभाव्य उद्योजकांच्या सर्व प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी कर्नाटक सरकार लवकरच एक वेबसाइट सुरू करणार आहे, असे मुख्य व मध्यम उद्योग मंत्री जगदीश शेट्टर यांनी शनिवारी सांगितले.
परदेशी गुंतवणूकदार परिषदेच्या कर्नाटक विभागाचे उद्घाटन करताना मंत्री शेट्टर यांनी उद्योग क्षेत्रात अधिक गुंतवणूक दारांना आकर्षित करण्यासाठी आणि राज्यात अधिक उद्योग स्थापन करण्याच्या उद्देशाने राज्य सरकार या क्षेत्राकडे विशेष लक्ष देत आहे.
लघु, मध्यम आणि मोठ्या उद्योगांसाठी उद्योग (सुलभता) कायद्यात सुधारणा करणारे कर्नाटक हे देशातील पहिले राज्य बनले आहे ही अभिमानाची बाब आहे, असेही त्यांनी म्हंटले आहे.
मंत्री शेट्टर यांनी उद्योग सुरु करण्यासाठी आणि औद्योगिक क्षेत्रात गुंतवणूक दारांना आकर्षित करण्यासाठी सरकारने गुंतवणूकदारांसाठी अनेक महत्वाची पावले उचलली आहेत. यापैकीच एकल-बिंदू वेबसाइट उद्योगांशी संबंधित सर्व प्रश्नांची उत्तरे देईल, असे त्यांनी म्हंटले आहे.
कर्नाटकमधील परदेशी गुंतवणूकदार मंच, विदेशी गुंतवणूकदार परिषद आणि जपानचे उप-वाणिज्य जनरल यांचे प्रतिनिधी या कार्यक्रमात सहभागी झाले होते.









