बेंगळूर/प्रतिनिधी
उत्तर कन्नड जिल्ह्याने राज्यात सर्वाधिक कोविड -१९ लसीकरण केले आहे. जिल्ह्यातील एकूण लक्ष्यित लाभार्थ्यांपैकी ६५ टक्के कर्मचाऱ्यांना लसीकरण केले आहे. जिल्ह्यात लक्ष्यित१४८३४ आरोग्य सेवा कर्मचार्यांपैकी ९,६९८ जणांना रोगप्रतिबंधक लसीकरण करण्यात आले आहे.
दरम्यान राज्यातील लसीकरणाची आकडेवारी पाहिल्यास यादगीर दुसर्या क्रमांकावर असून, त्याखालोखाल कोडगू (६३ टक्के), चिक्कबळ्ळापूर (६२ टक्के), आणि चिक्कमंगळूर (६१ टक्के) आहे. उत्तर कन्नडमध्ये बुधवारपर्यंत १४,५९२ कोरोना पॉझिटिव्ह कोविड आणि १७८ मृत्यूची नोंद झाली आहे.









