बेंगळूर/प्रतिनिधी
सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने कर्नाटक उच्च न्यायालयाच्या सहा अतिरिक्त न्यायाधीशांना कायमस्वरूपी न्यायाधीश म्हणून नियुक्त करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे.
१७ ऑगस्ट २०२१ रोजी झालेल्या बैठकीत सरन्यायाधीश एन. व्ही. रमण यांच्या अध्यक्षतेखालील कॉलेजियमने या प्रस्तावाला मंजुरी दिली आणि गुरुवारी सर्वोच्च न्यायालयाच्या वेबसाइटवर ही माहिती सादर करण्यात अली आहे.
ज्या न्यायाधीशांना कायम केले गेले ते आहेत – न्यायमूर्ती नेरानहळ्ळी श्रीनिवासन संजय गौडा, ज्योती मुलमणी, नटराज रंगस्वामी, हेमंत चंदनगौडर, प्रदीप सिंह येरूर आणि महेशन नागप्रसन्ना. (पीटीआय)