बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटक होळलकेरेचे आमदार एम. चंद्रप्पा यांनी मंगळवारी बेंगळूरमध्ये कर्नाटक राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (केएसआरटीसी) अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारला.
एम. चंद्रप्पा यांनी पदभार स्वीकारल्यानंतर भारताचे माजी राष्ट्रपती, भारतरत्न प्रणव मुखर्जी यांना दोन मिनिटांचे मौन पाळून श्रद्धांजली वाहिली.









