बेंगळूर/प्रतिनिधी
आरोग्यमंत्री डॉ. के. सुधाकर यांनी खासगी रुग्णालयांना कोविड -१९ रूग्णांसाठी बेड आरक्षित न केल्यास कठोर कारवाईचा इशारा दिला आहे. राज्यात कोरोनाचा प्रसार वेगाने होत आहे. दररोज कोरोना रुग्णांची संख्याही वाढत आहे. त्यामुळे आरोग्यमंत्र्यांनी खासगी रुग्णालयांना बेड आरक्षित करण्याच्या सूचना केल्या आहेत. राज्यात कोरोनाचा वेगवाढत असताना आरोग्यमंत्र्यांनी राज्यातील आरोग्य तज्ज्ञांशी चर्चा झाल्यानंतर त्यांनी सरकारी रुग्णालयांनाही कोविड रूग्णांसाठी अधिक बेड राखीव ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
मंत्री सुधाकर यांनी, “आम्ही खासगी रुग्णालयांना गेल्या १५ दिवसांपासून कोविड रूग्णांसाठी अधिक बेड आरक्षित करण्याची विनंती करत आहोत, पण त्यांनी फक्त१५-२० टक्के बेड दिले आहेत आणि इतरांनी आमच्या आवाहनाला उत्तर देण्यास टाळले आहे,” असे म्हणाले.
“आम्ही यावर गांभीर्याने विचार करणार आहोत आणि आम्ही गेल्या वर्षीप्रमाणेच सरकारी आदेशांचे पालन करण्यात अपयशी ठरलेल्या खासगी रुग्णालयांवर कठोर कारवाई करावी करणार आहे.”
मंत्र्यांनी खासगी रुग्णालयांना केवळ आपत्कालीन परिस्थितीतच कोविड नसलेल्या रूग्णांवर उपचार करण्यास सांगितले आहे. “कोविड रुग्णांना आवश्यक उपचार न दिल्यास आम्ही गप्प बसणार नाही. खासगी रुग्णालयांनी या संकटाच्या काळात सरकारबरोबर उभे राहिले पाहिजे. खासगी रुग्णालयांनी खासगी हॉटेल्समध्ये कोविड केअर सेंटर सुरू केले पाहिजेत आणि गंभीर परिस्थितीतच रूग्णालयात दाखल केले जाणे आवश्यक आहे, असे ते म्हणाले.