बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटकचे आरोग्य व वैद्यकीय शिक्षणमंत्री के. सुधाकर यांनी गुरुवारी मागील २४ तासात कोरोनाच्या घेण्यात आलेल्या एकूण नमुन्यांपैकी ८० टक्के नमुन्यांची तपासणी आरटी-पीसीआर पद्धतीने झाली असल्याचे म्हंटले. बुधवारी राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत घट झाली आहे.
राज्यात सलग आठव्या दिवशी नवीन रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त होती. राज्यात १५५ प्रयोगशाळांमध्ये १,०७,३५४ चाचण्या घेतल्या असून त्यापैकी ८६,५००१ म्हणजेच एकूण चाचण्यांपैकी ८० टक्के चाचण्या आरटी-पीसीआर द्वारे करण्यात आल्याचे मंत्री सुधाकर यांनी म्हंटले आहे.