बेंगळूर/प्रतिनिधी
कोरोना चाचणी प्रक्रिया पारदर्शक आणि जलदगतीने करण्याच्या प्रयत्नात कर्नाटक सरकारने बुधवारी ऑनलाइन पोर्टल सुरु केल्याची घोषणा केली.
आता, कोरोना चाचणी अहवाल https://covidwar.karnaka.gov.in/service1 वर नमुना रेफरल फॉर्म (एसआरएफ) आयडी देऊन मिळू शकतो, अशी माहिती आरोग्य व कुटुंब कल्याण विभागातील अधिकाऱ्यांनी दिली आहे.
आरोग्य विभागाने स्पष्ट केले की कोरोना चाचणी केल्यांनतर ज्यांचे अहवाल पॉझिटिव्ह येतील त्या रुग्णांशी सरकार स्वतःहून संपर्क साधेल, असे म्हंटले आहे.
जर आपण पॉझिटिव्ह असाल तर घाबरू नका. शांत रहा आणि स्वतःला घरी एकटे ठेवा. कर्नाटक सरकार स्वतःहून आपल्या मोबाइल नंबरवर आपल्याशी संपर्क साधेल. आपत्कालीन परिस्थितीसाठी १०८ वर कॉल करा, असे निवेदनात म्हटले आहे.









