बेंगळूर/प्रतिनिधी
राज्यात १२ मेपर्यंत होणाऱ्या सर्व अभियांत्रिकी व डिप्लोमा परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत, अशी माहिती कर्नाटकचे उपमुख्यमंत्री सी.एन. अश्वथनारायण यांनी सोमवारी दिली. राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने सोमवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत १४ दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतला आहे. दरम्यान “कोरोना कर्फ्यू २७ एप्रिल रोजी रात्री ९ वाजल्यापासून लागू होणार आहे.”
उच्च शिक्षण विभागाचे प्रभारी अश्वथनारायण यांनी, कर्फ्यू कालावधी पूर्ण झाल्यानंतर परीक्षांच्या नवीन तारखांची घोषणा केली जाईल, अशी माहिती त्यांनी दिली आहे.









