बेंगळूर/प्रतिनिधी
राज्य विधानसभेचे आठ दिवसांच्या पावसाळी अधिवेशनाला सोमवारी योग्य खबरदारी घेत सुरुवात झाली. यावेळी आमदार व विधिमंडळ कर्मचारी मास्क, ग्लोव्हज, परिधान करून तेथे सभावृहत दाखल झाले. केवळ कोरोना निगेटिव्ह प्रमाणपत्र असणार्यांनाच प्रवेशास परवानगी देण्यात आली.यावेळी सभागृहातील सर्व उपस्थित व्यक्तींनी आरोग्याची काळजी घेत सभागृहात उपस्थिती लावली होती. सुमारे
सभागृहात प्रवेश करण्यापूर्वी प्रत्येक आमदारांनी मास्क घातला होता. सभागृहात प्रत्येकाच्या जागेवर सॅनिटायझरच्या बाटल्या ठेवल्या होत्या. सामाजिक अंतर कायम ठेवण्याच्या मार्गदर्शक सूचनांच्या अनुषंगाने विधानसभा आणि विधान परिषद सदस्यांसाठी विशेष आसन व्यवस्था करण्यात आली आहे. यामध्ये यामध्ये ७० आमदार,एमएलसी आणि बाराहून अधिक मंत्री कोरोना पॉझिटिव्ह आहेत. त्यामुळे खबरदारी म्हणून सचिवालयाने ही व्यवस्था केली आहे.
बेंगळूरमध्ये सोमवारी सकाळी पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधानसभेत कार्यवाही सुरू झाली तेव्हा तीन पक्षांचे केवळ ६० आमदार सभागृहात उपस्थित होते. ७० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या आमदारांना सभागृहापासून दूर राहण्यास सांगण्यात आले आहे. आमदारांची संख्या कमी असल्याने सभागृहातील बहुतेक खुर्च्या रिक्त होत्या. भाजपचे अनेक मंत्री व आमदार गैरहजर होते.









