बेंगळूर/प्रतिनिधी
कोरोनामुळे शाळा, महाविद्यालये बंद आहेत. सरकार राज्यात पुन्हा महाविद्यालये सुरु करण्याचा विचार करत आहे. यासाठी विद्यार्थी, शिक्षक आणि कर्मचारी यांचे लसीकरण केले जात आहे. सरकारने याआधी विद्यार्थी, शिक्षक आणि कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्ण झाल्यानंतरच महाविद्यालये सुरू केली जातील असे म्हंटले होते. दरम्यान, राज्यात विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचार्यांचे लसीकरण केले जात आहे. राज्यात आतापर्यंत २१ लाख महाविद्यालयीन विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचार्यांपैकी तब्बल ८ लाख जणांना लस देण्यात आली आहे.
सरकारने यापूर्वी असे म्हटले होते की आरोग्य विभाग जुलैच्या पहिल्या आठवड्यात वर्गातील प्रत्येक विद्यार्थ्याला लसीचा पहिला डोस देण्याची योजना आखत आहे. विद्यार्थी संख्या १५ लाखाहून कमी आहे.
नॅशनल हेल्थ मिशनचे संचालक डॉ. अरुंधती चंद्रशेखर यांनी शुक्रवारी, “महाविद्यालये मागील एक वर्षापासून बंद आहेत. विद्यार्थ्यांना हे खूप अवघड आहे. महाविद्यालये पुन्हा उघडण्यासाठी आम्ही महाविद्यालयात विशेष लसीकरण मोहीम सुरू केली आहेत.” लाभार्थ्यांची २१ लाख संख्या असून त्यापैकी ८ लाख जणांना लस देण्यात आली आहे. या लस उपलब्धतेच्या आधारे आम्ही अधिकाधिक प्राधान्य गटांना लस दिली आहे, ” असे त्या म्हणाल्या.
८ जुलै रोजी उपमुख्यमंत्री आणि उच्च शिक्षण मंत्री अश्व नारायण यांच्या कार्यालयात प्रदान केलेल्या बीबीएमपी झोननिहाय आकडेवारीनुसार ६२,२५५ विद्यार्थी आणि सरकारी पदवी आणि अनुदानित पदवी महाविद्यालयातील ५१.१२ टक्के लसीकरण करण्यात आले आहे. लसीकरण केलेल्यांपैकी २,५१८ कर्मचारी आणि ३१,१४७ विद्यार्थी आहेत.









