बंगळूर / प्रतिनिधी
देशावर कोरोनाचे मोठे सावट आहे. त्यामुळे अनेक जणांवर आर्थिक संकट ओढवले आहे. अनेकांच्या नोकऱ्या गेल्या तर अनेक ठिकाणी कामगारांची कमतरता भासत आहे. यासाठी कर्नाटक सरकारकडून येत्या ७ जुलै रोजी महाऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार आहे. यामध्ये रोजगार देणारे आणि रोजगार शोधणाऱयांमधील दरी कमी करण्यासाठी या मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार असल्याचे कर्नाटकचे मुख्यमंत्री बी.एस.येडीयुरप्पा यांनी सांगितले आहे. राज्य सरकार कोविड १९ मुळे नुकसान झालेल्या आर्थिक आणि औद्योगिक उपक्रमांना पुनरज्जीवित करुन सरकार रोजगार निर्मिती करण्यासाठी वचनबद्ध राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.









