बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटकात कोरोना सक्रिय रुग्णांची संख्या दिवसेंदिवस कमी होत असल्याने प्रशासनाला दिलासा मिळाला आहे. पूर्ण लॉकडाऊननंतर राज्यात पॉझिटिव्ह रुग्णसंख्येत मोठी घट झाली. राज्य सरकारही हळूहळू निर्बंध कमी करत आहे. राज्यात सध्या सक्रिय रुग्णांची संख्या २८ हजारापेक्षा कमी आहे. राज्यात गेल्या २४ तासात १,२९१ नवीन बाधित रुग्णांची नोंद झाली. तर ३,०१५ रुग्ण कोरोनावर मात करत रुग्णालयातून घरी परतले. तर राज्यात सोमवारी ४० संक्रमित रुग्णांचा मृत्यू झाला. राज्यात सध्या एकूण सक्रिय रुग्णांची संख्या २७,५२७ इतकी आहे. सोमवारी राज्यात सकारात्मकतेचे प्रमाण ०.९४ टक्के होते. तर केस मृत्यू दर (सीएफआर) वाढून ३.०९ टक्के झाला. तर रविवारी ही दर २.१० टक्के होता.
दरम्यान, राज्यात आतापर्यंत एकूण कोरोना रुग्णांची संख्या २८,८५,२३८ लाखावर पोहोचली आहे. तर यापैकी २८,२१,४९१ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तसेच आतापर्यंत ३६,१९७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे
राज्यात बेंगळूर शहरी जिल्ह्यात सोमवारी कोरोनाचे २६६ पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. तर याचवेळी १,२०२ रुग्ण कोरोनावर मात करत रुग्णालयातून घरी परतले. तसेच जिल्ह्यात ६ कोरोना संक्रमित रुग्णांचा मृत्यू झाला.









