बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटकात कोरोना बाधित रुग्णांचे मीटर थांबता थांबेना झाले आहे. कोरोनाने बुधवारी कर्नाटकमध्ये उच्चांक गाठला. चोवीस तासात राज्यात ४७६४ नवीन कोरोना बाधितांची भर पडली आहे. एकट्या बेंगळूरमध्ये कोरोनाची २०५० प्रकरणे नोंदवली गेली आहेत. तर राज्यात बुधवारी एकूण ५५ कोरोना बाधित लोकांचा बळी गेला, त्यापैकी १५ बेंगळूरमधील आहेत.
आरोग्य विभागाच्या माहितीनुसार राज्यात कोरोनाची एकूण सक्रिय प्रकरणे बुधवारी वाढून ४७०६९ झाली आहेत. तर आनंदाची बातमी म्हणजे बुधवारी, राज्यातील विविध जिल्ह्यांतील १७८० कोरोना रुग्ण बरे होऊन रुग्णालयातून घरी परतले आहेत. यामध्ये बेंगळूरमधील ८१२ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.









