बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटकात कोरोना बधितांची संख्या झपाट्याने वाढताना पाहायला मिळत आहे. मंगळवारी राज्यात ३६०० हुन अधिक रुग्ण सापडले आहेत. यामध्ये राज्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांपैकी ५० टक्क्यांहून अधिक रुग्ण हे बंगळूरमध्ये आहेत. मे आणि जुलै दरम्यान, कोरोना रुग्णांच्या संख्येत ६०० पट वाढ झाली आहे. १ ते २० जुलै पर्यंत राज्यात कोरोनाचे ५२१७६ नवीन रुग्ण आढळले आहेत. यापैकी २८६७४ रुग्ण हे एकट्या एकट्या बंगळुरूशहरातील आहेत. याच काळात राज्यात एकूण १,१६२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. रुग्णांची संख्या वाढण्यामागे अनेक कारणे आहेत आणि यासाठी कोणालाही जबाबदार धरले जाऊ शकत नाही, परंतु आरोग्य तज्ज्ञांच्या मते कोरोना वाढीमागे मुखवटे आणि सामाजिक अंतर या नियमांचे उल्लंघन करणे एक मोठे कारण आहे.
राजीव गांधी आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू आणि कोविड-19 क्लिनिकल विशेष समितीचे प्रमुखडॉ.एस.व्ही. सचिदानंद यांच्या मते, नागरिक मुखवटे आणि सामाजिक अंतर या नियमांचे काटेकोरपणे पालन करीत नाहीत. तसेच हातांच्या स्वच्छतेकडेही विशेष लक्ष देत नसल्याने कोरोना संक्रमित रुग्णांची संख्या वाढत आहे. तर कोविड टास्क फोर्सचे सदस्य डॉ. सी.एन. मंजुनाथ, यांच्या मते मुखवटे, सामाजिक अंतर आणि हाताने स्वच्छता ही कोरोनाविरूद्धच्या लढ्यामध्ये प्रमुख शस्त्रे आहेत. लोकांनी या प्रकरणाचे गांभीर्य समजून घेतले पाहिजे आणि सरकारने दिलेल्या नियमांचे पालन केले पाहिजे. शहरांमध्ये जास्त लोकसंख्या किंवा घनता देखील कोरोना संक्रमणाच्या वाढीमागील एक प्रमुख कारण आहे.









