बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटक सरकारने १ फेब्रुवारीपासून राज्यभरातील ९ वी, १० वी आणि प्रथम व द्वितीय वर्षाच्या पूर्व विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांसाठी पूर्ण-दिवस वर्ग घेण्याचा निर्णय घेतल्याचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षणमंत्री एस. सुरेश कुमार यांनी सांगितले.
आतापर्यंत मिळालेल्या माहितीच्या आधारे विद्यार्थ्यांचे आरोग्य आणि शैक्षणिक भविष्य लक्षात घेऊन कोविड -१९ च्या राज्य तांत्रिक सल्लागार समितीशी सल्लामसलत करून हा निर्णय घेण्यात आला.
बैठकीत आम्ही आरोग्यमंत्री (के. सुधाकर) आणि कोविड -१९ तांत्रिक सल्लागार समिती सदस्यांशी चर्चा केली. इयत्ता ९ वी,१० वी, प्रथम आणि द्वितीय वर्षाच्या पीयूसी (वर्ग ११ व १२) साठी पूर्ण दिवस वर्ग सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. १ फेब्रुवारीपासून पूर्ण दिवस वर्ग सुरु होतील, असे मंत्री सुरेश कुमार म्हणाले.
बेंगळूर येथे पत्रकारांशी बोलताना मंत्री सुरेश यांनी सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी शालेय शिक्षण चालू ठेवणारा विद्यागम कार्यक्रम जसा आहे तसाच सुरू राहणार असल्याचे म्हंटले.